Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

चारोळी

Share

तु दिसल्यावर तुझ्यापासुन लांब
जावेसे वाटत नाही....
पण लांब जायलासुद्धा तु
जवळ येत नाहिस

***************

मी दाखवत नाही म्हणून
तुला माझ प्रेम कळत नाही...
आणि कळत असलं तरी..
तुही ते दाखवायचा प्रयत्न करत नाही...

*********************

अग जवळ लांबचं काय घेउन बसतेस,
तू डोळ्यात राहतेस अन मनात वसतेस
आणखी बोलायला कशाला हवं

*******************

डोळ्यांचं भाषांतर कलायला हवं
डोळ्यांची भाषा कळत नाही...
अन शब्दही अपुरे पडतात....
तुझ्या जवळ याव म्हटल .....
तर पावलही अडखळतात......

*******************

शब्दात नाही जमत तर
कोरं पत्र पाठवून दे
तू नाही आलीस तरी चालेल
तुझं मनं त्यात पाठवून दे

*******************

मन तर माझ मी
केव्हाच तुला दिलय
हृदयावर ही केवळ
तुझच नाव लिहीलय

*******************

अरे मन दिलं हे
मनात ठेवायचा नसतं
एकदा तरी ते
ओठावर आणायच असतं

*******************

डोळ्यांनी भाषांतर करतोस
ओठांवर भावना आणण्यास सांगतोस
पण स्वतः मात्र प्रत्यक्ष येउन
बोलायला किती घाबरतोस

*******************

प्रत्यक्ष येउन बोलायला
माझी हरकत कधीच नाही
पण मी जाणतो, जो प्रेमात पडतो
तो सावरत कधीच नाही

*******************

अरे प्रेमात धडपडायला
होत नसते तर प्रेमच
धडपडत्या मनास
सावरत असते

*******************

प्रेमात धडपड होण्याची
इतकी भीती बाळगतोस
मग रोज समोर येउन
डोळ्यांची भाषा तरी का बोलतोस?

*******************

ज्याला धड चलता येत नाही
तो प्रेमात काय पडणार
असलं पांगळ प्रेम
आपल्याला नाही परवडणार
*******************
मी प्रेमात पडलो, प्रेमात रडलो
म्हणुन प्रेमाला भीतो
दुधाने जळालेला
ताक पण फुंकून पितो

*******************

premala bhito,to kasla premi?
prem karnaryane needar asava nehmi,
prem hi ek sundar bhavna aahe,
prem hi hridayachi samvedana aahe.

*******************
ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला, आजवर माहितीये
ओठावर ठेवतो खोटं हसू
खुप दुखतं खोलवर माहितीये

*******************

प्रेमात लाभलेल्या अश्रुंना ही
वेगळे महत्त्व असते
त्यातूनच तर नंतर
प्रेमाची खरी जाण कळते

*******************

ट्रेन मधून तिच्या बरोबर
जाण्यात अर्थ आहे
प्लेटफोर्म वर उभा राहून
टाटा करणं व्यर्थ आहे

*******************

jichyavar prem karto,
ti vyakti dukhavu shakate,
pan khudda prem itke sundar asate,
je vedananna sukhavu shakte.

*******************

प्रेम तिनं करू नये जिला
मझ्या भावना कळत नाही
शुन्य गुंतवणकीवर कधी
परतफेड मिळत नाही

*******************

प्रेम हे वेड्या तराजूत
नाहीत रे तोलत
खरे प्रेमी प्रेमाच्या बदल्यात
प्रेमाची अपेक्षा नाहीत रे करत

*******************

अपेक्षा नाही करत मी
मान्य, प्रेमात ही वाद हवा
पण दोन हाकांना किमान
एक तरी प्रतिसाद हवा

*******************

अपेक्षा नाही केलीस पण मग ठाम मागणी ही केली नाहीस
हाक मारलीस तीही मी दूर गेल्यानंतर..
तुला सतवनारा प्रश्न माझ्या प्रतिसादाचा होता
की तुझेच प्रेम असन्या-नसन्याचा?

*******************

जे आपल असत ते काय् मागयच
सरळ द्यायच अन् घ्यायच
प्रेम करतेस म्हणतेस...
पण एवढ तरी कुठं तुला कळत......

*******************

प्रतिसाद द्यायला
माझी साद तरी ऐकलीस का सखे....
अग् जाता जाता
एकदा तरी मागे वळून बघितलस कुठे.....

*******************

प्रश्न तर माझे खूप सारे असतात
उत्तरे तू देशील का ?
डोळ्यातले भाव जाणून माझ्या
स्वतः येउन बोलशील का?

*******************

काही प्रश्न अनुत्तरित असतात....
ते तसेच राहू देत.....
अन आपल्या पुढच्या
भेटीची ओढ वाढ्वू देत.....

*******************

नुसत डोळ्यांनी तरी प्रेम
किती दिवस व्यक्त करणार
मनातल्या भावनांना
ओठावर कधी स्थान मिळणार?

*******************

सादेत तुझ्या जाणवली
नाही ती आर्तता
करू कशी मी तरी
तुझ्या स्वप्नांची पुर्तता

*******************

माझ्या सादेकडे तुझं
लक्ष तरी कुठे होत.....
तुझ मन दुसर्याच
स्वप्नांच्या राज्यात गुंतल होत...

*******************

नुसत्या डोळ्यांनी प्रेम् करण्याची
मजा काही और असते......
थोडीशी जादू,थोडीशी धुंदी,थोडीशी नशा,
अन् थोडीशी सजा असते.....


*******************

स्वप्नात अवतरून ही
प्रत्यक्षात न भेटू शकलीस
सागरडोहात बुडणार्‍या मज
काडीचाही आधार न देऊ शकलीस

*******************

डोळ्यातल्या भावना शब्दात
मांडता प्रेम अजून खुलते
त्या वेळीच तर प्रेमाचे
खरे रूप साकारते

*******************

आधार देण्याचा मी प्रयत्न केला....
पण तु माझा आधार नाकारला.....
अन् तुला वाचवण्याचा माझा.....
हर प्रयत्न निष्फळ ठरला.....


*******************

प्रेमाची सगळीच रुप निराळी......
कधी रम्य वनराई..
कधी ॠतु वसन्त....
तर कधी रात्र काळी....

*******************

वाचवायला गेलीस पण
माझे मन वाचू शकली नाहीस
स्वप्नात आधार दिलास पण
प्रत्यक्षात समोर आली नाहीस

*******************

प्रत्यक्षात नाही .....
तरी स्वप्नांत भेटू.....
अन् एक दिवस प्रेमाची.....
शिखरे गाठू .......

*******************

प्रेम तिनं करू नये जिला
मझ्या भावना कळत नाही
शुन्य गुंतवणकीवर कधी
परतफेड मिळत नाही
----------------------
प्रेमात कशाला रे .....
गुंतवणूक अन् परतफेडीही भाषा.....
त्यात तर सर्वस्व लुटूनही.....
हसण्याची आशा......

*******************

Q- प्रेमात कशाला रे .....
गुंतवणूक अन् परतफेडीही भाषा.....
त्यात तर सर्वस्व लुटूनही.....
हसण्याची आशा......

A-सर्वस्व तर केव्हाच
लुटून बसलं आहे
मी तिच्यावर आणि
जग माझ्यावर रुसलं आहे

*******************

रुसवे फुगवे कशाला आता....
जेव्हा प्रेमाची बात......
जगाच्या ही पुढे जाऊ...
जर देशील मला साथ....

*******************

साथ देइन
सात जन्मांपर्यंत
जन्मल्या पासून
अगदी मरण्या पर्यंत

*******************

जन्म-मरण ना असे ......
आपुल्या हाती..
स्वर्गातुनच जुळून येती ......
जन्मोजन्मीच्या गाठी....

*******************

जन्म मरण जरी नसले
आपल्या हाती
जगे पर्यंत असेल
हात माझा तुझ्या हाती

*******************

हात पकडायला खूप
जण असतात तत्पर
पण जीवनभर साथ द्यायला
कुणी नसत तयार

*******************

Geeta this one for u
स्वर्गात जर जुळून येती
जन्मोजन्मीच्या गाठी... तर
सारखी का तुटत असतात
इथे प्रेमाची नाती

*******************

अरे हात पकडनार याचा अर्थ
शब्दशा घेऊ नकोस
इतरांसारखी तू ही माझी भावना
शब्दात पकडू नकोस

*******************

एकदा हात दिला की
परत मागे फिरणार नाही ....
आपल्यामधे आता मी
सावलीला पण येऊ देणार नाही ....

उरलेले सर्व क्षण आता तुजे जाले ...
आले मी सख्या..सर्वस्व सोडून आले...

*******************

बराच फरक आहे
आली म्हणने आणि येण्यात
बराच फरक आहे
माझी झाली म्हणने आणि होण्यात

*******************

हात पकडायला तर आधी
सारेच जवळ येतात ..
नंतर मात्र हातावर केवळ
अश्रु देऊन जातात

*******************

मी फ़क्त तुजीच होते अणि तुजीच राहणार...
जाऊ दे रे....
अधि कधीच समजुन घेतल नाहीस मला...
तू आता काय घेणार??

*******************

फ़क्त हात मागत नाही
हाता संगे मन दे
ठराविक काही मागत नाही
काहिपण दे

*******************

तुला समजुन घेण्यात
मलाच हरवून बसलो
तू गेल्यावर आयुष्यच
गमावून बसलो

*******************

समज नव्हतीच मला
हे तुला आधीच समजावलं होतं ना ?
तरी समजुन घेशील मला
हे तूच सुनावलं होतं ना ?

*******************

मन मागण्या आधी
माझ्या मनातल तर जाण
हात पकड़ण्यासाठी आधी
तुझा हात तर पुढे आण

*******************

तुझ्या जाणिवेची नक्कीच
आहे मला जाण
उगीच नाही होत ही
नजरेची देवाण घेवान

*******************

नजरेची देवाण घेवाण ??
प्रेम आहे दोन मनांचा मेळ....
तू स्वताच बनावलेस नियम..
अन केलास माज्या आयुष्याचा खेळ...

*******************

दोन
मनांचा मेळ ?
असे बोलूनच मारून नेली
तू प्रत्येक वेळ

*******************

धडपड अजुनही सुरूच आहे
तुला समजुन घेण्याची...
आस अजुनही तशीच आहे
तुझ्या पापण्यांच्या सावलीत झोपायची....

*******************

माझ्या पापण्यांच्या सावलीत
तुझचं स्वप्न नवं होतं
तू समजलं असतं तर मला
आणखी काय हवं होतं

*******************

स्वप्नातच तुझ्या रमलिये मी ....
कधीतरी स्वताहून बोलशील
या आशेवर जगलिये मी...
समजते तर सगळे काही
पण समोर येउन कधीच
तू बोलत का नाही??

डोळ्यात बघून माझ्या
फक्त एकदाच बोल ना..
ह्रुदयाचे बंद दरवाजे तुझ्या
माझ्यासाठी खोल ना...

*******************

हृदयचं कवाड खोललं
तर सांग चालेल तुला ?
समोर येउन मनातलं बोललं
तर सांग चालेल तुला ?

*******************

उघड तुझ्या ह्रुदयाचे कवाड ....
खुप पाउस पाड...

पण...

आधी एवढ दुखवलयस की..
ह्रदय चिम्ब भिजवलस
तरी कोरडीच राहीन मी...
आसवांचा महापुर दिलास
तरी हसतच राहीन मी...

*******************

तू दुखी असताना
मी हसणं शक्य नाही
तू माझी नसताना
माझं असणं शक्य नाही

*******************

तू होशील माझी जेव्हा
मी असेल आसमांत
चंद्रापार घेउन जाइल
तुला मी दिमाखांत

*******************

Sukh ani dukkha,
shevti mananyavar asta...
ekhadyacha asna kinwa nasna,
varvar sangnyavar asta.........

*******************

नको होऊ दुखी तू
अशीच हसत रहा
जेव्हा होशील माझी तू
सरे सुख देइल पहा

*******************

एकटं एकटं सुख
किती विद्रूप वाटतं
तू सोबत असलीस तर
दुख सुद्धा सुखरूप वाटतं

*******************

दुखाचा प्रश्नच येत नाही
तू सोबत असलास तर....
पण परत येउच नकोस
पुन्हा सोडणार असलास तर....

*******************

होतास सोबत तेव्हा
मिळायची जगण्याची स्फुर्ती
पण आता सोबत आहे
फ़क्त अश्रुंची गळती


*******************

सोडायच तर तुला तेव्हाही नव्हत
पण तुझ्या डोळ्यात
दुसर्‍याबद्दल प्रेम
मला नव्हत बघवत

*******************

मी तुला सोडेन याचा
विचार सुद्धा करू नकोस
तुझ्या तू सुख चालून येइंल
दुखाचा विचार सुद्धा करू नकोस

*******************

प्रेमात पडताना तर
करतोस खूप सारे वायदे
पण पाळायलाच विसरतोस
प्रेमाचे सारे कायदे

*******************

माज्या डोळ्यात तू
नीट पाहिल असतस....
तर आज चित्र नक्कीच
काहीतरी वेगळ असत...
निदान तुझ्या अंगणात तुलस
अन माज्या दारी निवडुंगच रोपट नसत...

*******************

तू माला सोडून जाशील
हा विचार मी
तेवाही केला न्हवता....
मला तुला हे सांगायला लागेल
हे तरी तेव्हा कुठे ठावुक होत??

*******************

विचारत फिरू नकोस
सत्यात ये
भुतकाळात जाऊ नकोस
सध्यात ये

*******************

chitrat majhya tu ,
jar rang bharle aste,
nivdungawar suddha,
gulab fulale aste...

*******************

तुझ्यासाठी मी फुलांची
परडी सजविली
पण तीच फूले तू
माझ्या अर्थीवर वाहिली

*******************

अर्थहीन जगण्यात
काय अर्थ आहे
त्यापेक्षा स्वखुशीने
मरणं सार्थ आहे

*******************

तुझ्या डोळ्यात कित्येकदा
मी चंद्राचे रूप पाहिले
याच चंद्राच्या शितलतेने
शेवटी मला जिवंतपणी जाळले

*******************

एक तर न विचारता
डोळ्यात डोला घातलास
घातलास तर बघताना
गोगल का नाही घातलास

*******************

नेहमी माझ्या हाताची
अपेक्षा करत असतोस
पण हात पुढे करताना
शेम्बुड तरी का पुसतोस ??

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
आई शप्पथ, सांगतो
जर मी ते आणले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
जर ते चित्र कसले आहे
हे मला कळले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
पण माझे रंग
वाया गेले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
जर ते चित्र
विचित्र नसते

*******************

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी हृदयात साठवलेला
पण नंतर तोच प्रत्येक क्षण
माझा जीव घेण्या उठला

*******************

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी हृदयात साठवलेला
पण मध्येच कुणीतरी
दरवाजा ठोठावला

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला, आजवर माहितीये
ओठावर ठेवतो खोटं हसू
खुप दुखतं खोलवर माहितीये
pan me kay boltoy raj
ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
मग इतके दिवस तू
जिवंत कसा राहिला?

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला
अन खंजीर लपवून
परत झोपला

*******************

अपेक्षा नाही करत मी
मान्य, प्रेमात ही वाद हवा
पण दोन हाकांना किमान
एक तरी प्रतिसाद हवा

*******************

मी तर हाक
दिली खुप
पण ती बाहिरी होती
यात माझी काय चुक

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला
अन खंजीर लपवून
परत झोपला
अणि तशा अवस्थेतही
गाढ़ झोपून राहिला

*******************

मान्य करतो तू दिलीस खूप हाक
पण इतका कर्कश आवाज ऐकायची
तिला सवय नसावी हयात
तिची तरी काय चुक??

*******************

अरे वेड्या ती बाहिरी आहे
असा मी सांगितलं ना
ती कशी ऐकणार
की तू पण बहिरा आहेस

*******************

daav bhandun tandun
modu nakaa.
aapaaplya aapanach
sudhara chukaa..


*******************

आधी तिच्या कानांना
नीट ऐकू यायच
पण तुझ्या आवाजामुळे आता
रोज कानांच्या डॉक्टरकड़े जाव लागत

*******************

स्वर्गात जर जुळून येती
जन्मोजन्मीच्या गाठी... तर
सारखी का तुटत असतात
इथे प्रेमाची नाती
-----------------
REPLY
प्रेम्,प्रेम् म्हणतात
ते समजलय कोणाला
नुसत आकर्षण
तरीही प्रेमाचा बोलबाला

*******************

प्रेम यशस्वी झाल की
असते ते महान
पण फसले की त्यास
ठरवतात आकर्षण

*******************

प्रेमाला आकर्षण बोलून
करत्येस त्याचा अपमान
त्याहून इतर कुठल नात
आहे का महान?

*******************

प्रेम कधी फसवे नसते
फसवतात् ती माणसं
फसवतात ती फसवतात अन्
दोश मात्र नशिबाला लावतात

*******************

प्रेमात मी तुला
फसवल नव्हत
तुझ्या इतक मी
स्वतः लाही जपल नव्हत

*******************

इतर नाती नसतील
ही एवढी महान
पण म्हणून त्याना कमी
लेखून करू नकोस लहान

****************

प्रेमाच नात आहे
इतर नात्यांहून श्रेष्ट
जीवनात त्याहून आहे का
इतर काही मीष्ट ?

****************

मी कुठं म्हटल
तु मला फसवलस...
पण दूर जावून.....
मला मात्र सतवलस.....

****************

जीवनात फक्त प्रेमच नव्हे
तर कर्तव्य् ही असतात
अन् तुझ्या प्रश्नाच उत्तर हेच्
कि म्हणून प्रेमाची नाती तुटतात

****************

दूर तर आपण
तेव्हाही होतो
सर्व बाबतीत जवळ
असूनही मनाने दूर होतो

****************

कर्तव्याप्रती माणस
प्रेम तोडतात
नंतर मात्र
कर्माने रडतात

****************

मनाविषयी काय रे बोलायच...
कारण मनापेक्षा ही चपळ
दुसर काय शोधायच.....

****************

मानतो मन असत
खूप चंचल
पण त्याहून असत
का काही प्रेमळ ?

****************

प्रेम् कधी तोडल किंवा जोडल
जात नाही..
अरे वेड्या त्या भावना कधी
समजावल्या जात नाही

****************

काळ कधी का
कोणासाठी थांबतो
जर तो थांबला तर
सजीव तिथेच सम्पतो

****************

मानतो प्रेम
आहे एक भावना
पण त्यात मिळते
का मग वेदना??

****************

जरी दोघानी जगायच असल
तरी भोवतालच जग ही
त्यात शामिल असत
म्हणूनच त्याला बंधन म्हटल जात

****************

manus jari sampala tari prem sampat nasat .......!
te japun theun pudhachi sat janma vaparaycha asta..

****************

aga jag fakta naval asta ............
shevtchya ghatkela konihi bajula nasta...

****************

प्रेमातल्या वेदना ह्या
मानण्यावर असतात
जरी नको म्हटल तree
सर्वानाच हव्याश्या वाटतात

****************

जगाचा विचार करताना
आपल प्रेम का संपवायच
इतरांसाठी त्याला बंधनाच्या
जाळ्यात का अड़कवायच

****************

बाजुला कोणी नसल
तरी मनात भीती असते
कोणी तरी पाहील म्हणून
आपलेच मन आपल्याला खात असते

****************

प्रेम केल मग
का घाबरयाच ?
इतरांसाठी आपल्या
मनाला का मारायच?

****************

जरी ते बंधन असले
तरी पाहीजे सगळ्याना
म्हणूनच जो तो तयार असतो
ह्या जाळ्यात अड्कायला

****************

प्रेमात नसावे
कशाचे बंधन
असावे फ़क्त
चांदण्यांनी भरलेले अंगण

****************

ani tya anganat asav chandrach chandana...............
ti asavi hat dharun nahi ajun kahi magana......

****************

कारण प्रेम लपून छपून करण
ही सुध्दा एक कला असते
सगळ्यानाच कळत नसते
जि एकांतात फुलासारखी खुलते

****************

प्रेमात पडताना
नसते हयगय
मग ते करताना
वाटावे कसले भय

****************

प्रेमात पड्ल्यावर चंद्र अन
चांदण्या दिसतात
अन प्रेमाच भूत उतरल्यावर
डोळ्यासमोर काजवे चमकतात

****************

prema chya navane jo ghabarla to prem kay karanar................
moklya hati ya jagat ala moklya hatich maranar........

****************

aga kajve sudha fakta andharatch distat...........
sarvani sath sodli ki manse premachach hat pakadtat..

****************

प्रेमात पडतो तेव्हा
माणूस स्वतःलाही विसरतो
तिच्यासमोर तो चन्द्रही
फिका पडतो

****************

जरी मोकळ्या हाती आल तरी
जगाला काही तरी देवून जाव
खुप् नाही पण थोड्या तरी
चांगल्या आठवणी मागे ठेवून जाव

****************

jagala athavani dyayla kahich harakat naste..........!
pan roz maranaryachi jag dakhal ghet naste............!

****************

जगाला देता देता
आपण ही थोड जगाव
एकदा तरी प्रेम
करून पहाव

****************

प्रेमात विसरणच तर
धोका देवून जात
कारण जग म्हणत म्हणत
एक दिवस खुद्द् प्रेमाचाही विसर पाडत

****************

प्रेम करण्याला काहीच
हरकत नसते
पण त्या प्रेमाचा अन्जाम
ही स्विकारण्यची तयरी ठेवावी लागते

****************

असल जरी प्रेम
विसरण अवघड
तरी नसत त्याहून
फळ कुठल गोड

****************

फळाची अपेक्षा करून केलेल प्रेम
हे प्रेम कसं
प्रेम तर् ते ही आहेच
आळवावर पाणी जसं

****************

गरजेच नाही की
प्रेम ठरेल नेहमी दुखद
खरे असेल तर
शेवटही असतो सुखद

****************

सुखद अन्ताच्या फ़क्त गोष्टीच
ऐकल्या
खर्या का खोट्या देव जाणे
कोणी पाहिल्या

****************

प्रेम करताना फळाची
अपेक्षा नाहीत करत
प्रेमात असताना इतर
कुठले फळ ही नाहीत चाखत

****************

are raja premala kadhihi shevat nasto................
paus gela mhanun samudra kahi atat nasto.....

****************

प्रेमाची अजुन सुरुवात
ही नाही केलीस
मग त्याच्या अन्ताची तरी
कशी कल्पना करू शकशील

****************

प्रेमच इतके आंबट गोड
मग दुसरी फळे कशाला
प्रेम हे प्रेमच त्याला
कुठ्ली ही उपमा कशाला

****************

प्रेम करायला कल्पनाशील
असाव लागत अस नाही
प्रेमात पड्ल्यावर सगळ आपसुक कळत
जस पोहोणर्याला पाणी

****************

प्रेमाला उपमा देणे
शक्यच नाही
त्याहून गोड फळ
जगात कुठले नाही

****************

पोहोण्यासाठी नदीत
उतराव लागत
लांबूनच नदीची खोली मोजण
शक्य नसत

****************

fal jari mhantala tari prem he badalat nahi............
halka ahe asa mhanun kahi parvat halat nahi............

****************

प्रेमाची ही कठीणच की
मोजण गर्ता
पण तरीही प्रेमात पडल्यावर
मग का रडता

****************

ayush he kahi nuste hasun jagayche naste......!
ashruna sudha baherche jag baghnyachi sandhi dyaychi aste.....

****************

प्रेमातल्या अश्रुंचे ही
स्थान असते खास
त्या खार्‍या पाण्यामुळेच
तर कळते प्रेमाची खरी मिठास

****************

पर्वताची उंची एक वेळ
गाठण शक्य आहे
पण प्रेमात "पडल्यावर"
आकाशाला हात लावण केवळ अशक्य आहे

****************

प्रेमात "पडायला"
होत नसते... तर
प्रेम पड़णार्‍यास
सावरत असते

****************

खरी आहे प्रेमाची मिठास
ही आगळीच असte
प्रेमाची हर एक अदाच
निराळी असते

****************

ya jagat ashakya asa kahich nasta........!
ulta premat padlyavar he jagach apla asta...........!

****************

प्रेमाचे वाहतात
जेव्हा झरे
रंग सामावण्या इन्द्रधनुही
पड़ते अपुरे

****************

तुझ्या प्रेमात मी
आकंठ बुडाले
पण मीप्रेमात पडले नाही
तर पंख लेवून आकाशी उडाले

****************

माझ्या त्रुषित मनाला
प्रेमाचा झरा दिसला
त्या क्षणी मला तो थेंबही
समुद्राहून मोठा वाटला

****************

प्रेमातल्या यातनांच्या भीतीने
नसत घाबरायच
फुलवाट समोर असताना
काट्यांवरून नसत धावायच

****************

प्रेमातल्या यातनांच्या भीतीने
नसत घाबरायच
फुलवाट समोर असताना
काट्यांवरून नसत धावायच
----------------------------
काट्यातुन धावतानाच
प्रेमाची किमंत कळते
अन विश्वासाने प्रेम करण्याची
हिमंत मिळते

****************

जरी मी लिहीत असले.......
तरी प्रेरणा दुसरच कोणी आहे....
जस चंद्र प्रकाशला....
तरी स्त्रोत मात्र सुर्यच आहे..

****************

सुर्य स्तोत्र असला तरी
चंद्राची शीतलता नाही येत नाकारता
प्रेरणा जरी असली तरी
सगळीच चित्र नाही येत आकारता....


तुझी प्रेरणा आहे म्हणुन
हे सारं जमलं
मनातल्या भावनांना
शब्दांत गुंफलं

****************

प्रेरणा असल्याशिवाय
शिल्प कुठ घडत
प्रेरणेशिवायच तर
भल्या भल्यांच घोड अडत

****************

तुझी प्रेरणा आहे म्हणुन
हे सारं जमलं
मनातल्या भावनांना
शब्दांत गुंफलं
-----------------
मनातल्या भावनांना
वाट करुन द्यावी नेहमी
कधी थोडी जास्त
कधी थोडी कमी

****************

काट्यांवरून वरुनहि चाललो होतो ग सखे
पायही होते रक्ताळलेले..
तू त्यांची दखल घ्यावी अशी नाही अपेक्षा केली मी..
पण तू नाहीं पाहिलेस ते डोळे पानावलेले

****************

रक्ताळलेल्या पायांची....
तुला आली कणव.....
पण रक्ताळलेले ह्र्दय बघून.....
थोडी तरी हेलव..

****************

काट्यातुन धावतानाच
प्रेमाची किमंत कळते
अन विश्वासाने प्रेम करण्याची
हिमंत मिळते
---------------------------------------------
प्रेमातल्या काट्यांचाही
स्पर्श असतो न्यारा
सुगंधाशी मैत्री करण्या तर
तत्पर असतो वाहणारा वारा

****************

वाहणार्या वार्याला अडवणे
महाकठीण कर्म
पण अशक्य ही करून दाखवणे
हाच प्रेमाचा धर्म

****************

तू किती ही अडवलं वार्याला
तरी तो वाहणार
तुझ्या धर्मासाठी तो त्याचा धर्म
थोडीच गहाण ठेवणार

****************

प्रेम या शब्दात
अर्थ तरी केव्ह्डा....
हिमालयाच्या सावलीलाही
पुरून उरेल एव्ह्डा...

****************

हिमालायावर ही बहुतेक कुणी
प्रेम केले आहे
म्हनुनच त्याचे अश्रु सारे
गोठून गेले आहे

****************

कुणाचं लक्ष्य आहे
का इकडे ?
कवितांचा दुष्काळ पडल का काय
सगळीकडे ?

****************

प्रेमाला नसते
काही वाचा
तुटले तर उरतात
फक्त काचा

****************

प्रेम म्हणजे आयुष्यातील
नितांत सुंदर वास्तु
handle with care लिहिलेली
एक अमूल्य वस्तु

****************

"प्रेम"....
दोन अक्षरात मर्म तरी केव्ह्डे...
जसे...
बाभलीच्या वनात दोनच सुगंधी केवडे..

****************

आज आईने डब्यात
दिले होते घेवडे
बाकि सगळं खाल्लं
घेवडे राहिले तेवढे

****************

प्रेम म्हणजे
जणू काचेचे भांडे
तुटले एकदा तर
अवघड जोड़णे

****************

आईच्या हाताची चव
तुला काय कळणार
गोड़धोड़ सोडून तू
तिखटच चरणार

****************

खुप झाला
खेळ
चला जायची
झाली वेळ

उदया भेटतो मित्रानो
उत्तर तयार ठेवा

****************

खेळ तर मित्र
आत्ताच सुरु झालाय
खेळण्याआधीच तू
मागे फिरू लागलाय

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही

****************

आईच्या हाताची चव
तुला काय कळणार
गोड़धोड़ सोडून तू
तिखटच चरणार

****************

खेळ तर मित्र
आत्ताच सुरु झालाय
खेळण्याआधीच तू
मागे फिरू लागलाय

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही
-----------------------------------
प्रत्येक गोष्टीला अपवाद
हा असतोच
माणूस जरी असला तरी
त्यातही एखादा अश्व्त्थामा असतोच

****************

छान जुगलबंदी जमली होती...

कोणी आहे का???

तुमच्या ह्या खेळात
सामिल होणार आहे मी ही
सगळ्याच वेळ नाही पाळता येणार
तेव्हा माफी असावी तुमची

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्यावर बोलु काही...

सोपंच तर आहे म्हणुन
आयुष्याचं गणित सोडवत बसले
प्रत्येक पायरीवर
एक नवीन गुंता उकलत बसले

****************

तुमच्या ह्या खेळात
सामिल होणार आहे मी ही
सगळ्याच वेळ नाही पाळता येणार
तेव्हा माफी असावी तुमची
-------------------------
वेळ पाळता आली नाही तरी
मन तर इथेच असेल ना
पुर्ण कविता नसुदे पण एखादी
चारोळी तरी गुणगुणशील ना

****************

सोपंच तर आहे म्हणुन
आयुष्याचं गणित सोडवत बसले
प्रत्येक पायरीवर
एक नवीन गुंता उकलत बसले
------------------------------
आयुष्याच् गणित
कधी कोणाला उकललय का
अग कितीही अधिक उणे केले तरी
हातात काही शिल्लक राहिलय का

****************

वेळ पाळणे जमेल ही एखाद्यावेळी
पण मनाला कशी आवरु
बांध फुटु पाहणारया शब्द्प्रवाहाला
चारोळीने कसी अडवु...

****************

वेळ पाळणे जमेल ही एखाद्यावेळी
पण मनाला कशी आवरु
बांध फुटु पाहणारया शब्द्प्रवाहाला
चारोळीने कसी अडवु...
---------------------------------
सुटु दे मोकाट तुझ्याही मनाला
उगाच का आवरायच त्याला
कधी एखादा अविष्कार ही घडवेल
सांगता येइल कुणाला

****************

मावळता सुर्य
जणू धरतीला सांगतो
वाट बघ माझी
पुन्हा तुला भेटायला येतो

****************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top