तुला विसरून जाऊ म्हणतेस
मला सांग ,
कसे शक्य आहे ?
गंधाविना फुल पहिलयं मी
पण, फुलाविना गंध असणे
कसे शक्य आहे ?
तू आणि पाउस दोघे सोबत यायचात
आता तुझ्याविना पाउस अनुभवणे
कसे शक्य आहे ?
ह्रदय शरीरात रक्त फिरवतं
पण, श्वासाविना ह्रदय चालावं
कसे शक्य आहे ?
मान्य, की तुझ्या डोळ्यांतील प्रश्न मला उमगत नाहीत
पण, या प्रश्नाचे उत्तर देणे
कसे शक्य आहे ?
कणा मोडल्यावर उभं तरी राहता येतं का ?
तुझ्याविना मी चालू शकणे,
कसे शक्य आहे ?
तू नसल्यावर मला जवळ करणारं कोण आहे ?
गर्दीमध्ये एकटे रहाणे,
कसे शक्य आहे ?
रडताना डोळ्यांत पाणी येणारचं,
आसवांशिवाय रडून घेऊ म्हणतेस,
कसे शक्य आहे ?
मी विचारणार नाही काय करशील माझ्याविना
पण, तुझ्याविना मी जगु शकणे,
कसे शक्य आहे ?
गुरुवार, २३ एप्रिल, २००९
कसे शक्य आहे ?
८:५४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा