Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

मला ग्रेस वाचायला आवडतो.

Share

नाही खरच मी रडकी नाही
हताश निराश मुळीच नाही
लढणारी, झुंजणारी
पण मनाला बरं वाटावं
इतकंच रडणारी
नशिबाला चिडवणारी

सुन्न करणा-या शब्दात
मला नेमका आधार सापडतो
उदास वाटताच...
मला ग्रेस वाचायला आवडतो.

दुःखाला मग घेऊन फिरते पर्समध्ये
कधीही उघडून वाचण्यासाठी
आणि हसून सोडून देण्यासाठी
मलाही कळून चुकलय
दुःख मांडायच कवितेत
आणि कामाला लागायच
दुःखही म्हणत असेल मनात
हे प्रकरण जरा गूढच आहे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top