Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

चारोळी

Share

सुटु दे मोकाट तुझ्याही मनाला
उगाच का आवरायच त्याला
कधी एखादा अविष्कार ही घडवेल
सांगता येइल कुणाला

----------------------------------

मनाला ही कधीकधी
आवर घालावा लागतो
गोड खाता खाता तिखटाचाही
स्वाद घ्यावा लागतो

*********************

दिवसभर सूर्य
धरतीला जाळतो
रात्री मात्र स्वतः
आकाशाआड़ जाउन लपतो

*********************

मनाला आवर जरूर घालावा
पण
लहान मुलासारख
स्वछंदी बागडून ही द्यावा..

*********************

रात्री सुर्याची
जागा चंद्र घेतो
अन् मग सुर्य परत
मिलनास आतुरतो

*********************

बागडता बागडता
मन धडपडत
ठेच लागता मात्र
जवळ कुणी नसत

*********************

सूर्य जर जमिनीवर
इतक प्रेम करतो
मग दिनभर समोर राहूनही
तिला का जाळतो

*********************

jivant nehami dusryavar avalambun rahaych nasta............!
vel kahi sangun yet nahi .
mhanun sawtahanech swatahal sambhalaych asta..........

*********************

वेड्या जवळ कुणी नसल तरी
देव सगळ बघतो
म्हणूनच अगदी वेळेवर तो
दुताला धाडतो

*********************

ह्या जळण्यात ही
असतो एक गोडवा
तुला काय मला काय
सर्वांनाच हवा

*********************

dusryala madat karanyasathi jar dev dutala dhadato ..........................
tar mag swataha sankatat sapdlyavar konachi madat gheto..........

*********************

स्वतः स्वतला किति रे सम्भळणार
मन ही कंटाळत
म्हणूनच कोणी तरी
आपल्याला सांभाळणार लागत

*********************

देव जर सर्व
पाहत असतो
मग सर्व नष्ट झाल्यावर
दूत का धाडतो

*********************

संकट निर्माण करणार तोच
हरणरा तोच
त्यची मदत आपण काय करणार
स्वताला तारणारा तोच्

*********************

जळण्यात जर
असतो गोडवा
आग लागल्यावर का मारतात
मग पाण्याचा फवारा

*********************

jagane takun dilelyalvar sambhalun kon ghenar..................
ujad walvantat adklelyala pani kon denar.............

*********************

आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव
करवायचा त्याच्याकडे हाच् उपाय
जर सगळ नीट केल तर
त्याची आठ्वण राहील काय

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top