Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २५ एप्रिल, २००९

लहान(?) मुलांसाठी गोष्ट

Share

वय वर्षे - अडूसष्ट
नातवाला सांगतो - गोष्ट

गोष्टीतली राजकुमारी - शिष्ट
तिच्यावर आले - अरिष्ट

झाले तिला - कुष्ठ
राजा झाला - क्रोधिष्ठ

बोलावले वैद्यराज - ज्येष्ठ
त्यांचे औषध - श्रेष्ठ

औषधाची चालेना - मात्रा
राजाने केली - यात्रा
वाटेत लागली - जत्रा

जत्रेत होते - कुत्रे
लेवुन भरजरी - वस्त्रे
तोंडपाठ त्याला - शास्त्रे

दोघे खेळले - सारीपाट
बुद्धिमत्ता कुत्र्याची - अफाट
राजा झाला - अचाट

कुत्र्याला घातले - साकडे
करीन सोन्याचे - तबकडे
कुरवाळले शेपूट - वाकडे

कुत्रा म्हणाला .... घुरर घुरर

अरेच्चा??

बाळा, ऐकतो आहेस ना?
झोपलास? बर, उरलेली गोष्ट उद्या!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top