भले शब्द होते बुरे शब्द होते
संतांचे अभंग
अन् तमाशातली लावणी होते
कधी भक्तिरसाने ओथम्बलेले
तर विषयासक्त कधी होते.
भले शब्द होते बुरे शब्द होते
मनाचे श्लोक
अन् गीत-रामायण होते
कधी सज्जनांचे आचरण
तर अगतिकता सीतेची कधी होते
भले शब्द होते बुरे शब्द होते
ऊस्फुर्त काव्य
अन् सुरेल गीत होते
कधी कल्पनेपलिकडले
तर जुळवलेले यमक कधी होते
भले शब्द होते बुरे शब्द होते
श्रीमदभगवदगीता
अन् पुराणातले वेद होते
कधी ब्रम्हान्डदर्शन
तर युगांचे अत्याचार कधी होते
भले शब्द होते बुरे शब्द होते
जन्मो-जन्मीची गाठ
अन् जन्मान्तरही होते
कधी मंगलाष्टके
तर कधी तेराव्याचे विधी होते
भले शब्द होते बुरे शब्द होते
पण ...
शब्दच होते.
शनिवार, २५ एप्रिल, २००९
... पण शब्दच होते
१२:०४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा