Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २५ एप्रिल, २००९

देहदानाचा धंदा

Share

सोयर-सुतक मला न कसले
न सापडते गर्तेत भावनांच्या
देहाची गरज केवळ जाणते
धंद्यात मी देहदानाच्या

भर बाजारी दुकान थाटते
बोली लावते कवड्यांच्या
संभोग-वेदीवर हवनासाठी
समिधा विकते यौवनाच्या

नववधुसारखी लाजते
शृंगारात मी विकतच्या
जाणतेपणी हरखते
सौभाग्यात मी प्रहरभराच्या

खंत नाही खेदही कसले
शोधात क्षणभर सुखाच्या
चार पायर्‍या जास्त चढले
तुलनेत मी द्रौपदीच्या

पंगतीवर पंगती उठविते
आसुसणार्‍या भुकेल्या शरीरांच्या
देहदानाचे पुण्य माझे
खजिन्यालाही लाजवील कुबेराच्या.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top