Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, २७ एप्रिल, २००९

चारोळी

Share

तू समोर असली की तूझी
आठवन काढत बसतो
तू दूर गेलीस की तुझ्या
आठवणी साठवत बसतो

******************************

एखादा पदार्थ बिघडला ,
की दुरुस्त नाही करता येत,
अगदी जिवलग मैत्रिनिनी केला असेल तरी,
डोले मिटून फस्त नाही करता येत...!!

******************************

सगली सुखं
तिच्याबरोबर वाटून घेइन
विष जरी दिले मला
ते ही डोळे मिटून घेइन

******************************

विष पचवलस,तर नीलकंठ होशील,
आवडेल का ते तिला ?
शोभून दिसेल का रे ते
तिच्या गोर्या रंगाला ?

******************************

प्रेमात पहु नए
रंग आणि रूप
दोन मनानं फ़क्त
व्हावं एकरूप

******************************

रंग आणि रूप पाहून प्रेम कधीच करू नये,
मानाने जडलेल प्रेम च खरे प्रेम असते,
पण हे फक्त चारोळित च वाचायला छान वाटते,
कारण ह्या जगात मनापेषा रंग आणि रूप नेहमीच वरचढ ठरते.......

******************************

रंग रूप बदलत जातात
बदलत जातात माणसांची आवर्तनं
खरं प्रेम बदलत नाही
बदलतात ती निव्वल आकर्षणं

******************************

मानसाचे आवर्तन बदलले की माणसे ही बदलतात,
माणसाचे आकर्षण बदलले की ,पसंती ही बदलते,
खरी खरी वागणारी माणसे मग खोटी वागयाला लागतात,
मग खरे प्रेम बदलले नाही तरी आपले आयुष्य नक्की बदलून जाते......

******************************

प्रेमात पहु नए
रंग आणि रूप
दोन मनानं फ़क्त
व्हावं एकरूप

******************************

प्रेम आंधल असत अस म्हणतात ,
पण प्रेमी तर डोलस असतात ना ?
डोळे उघडे ठेवून केलेल प्रेमच खर,
नाहीतर फसवल , अस म्हणतात ना ?

******************************

खरंच, प्रेमात पडल्यावर
माणुस होतो का आंधळा?
बरं-वाईट हि न झेपण्याइतकं
होतो का तो पांगळा??

******************************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top