अग ,आन्धल ,पांगल,काही नसत ग,
बुद्धि वर आलेली झापड़ असतात.
भल्या -भल्यांची,प्रेमात झालेली माकड असतात.
******************************
प्रेमाबद्दल बोलायचं म्हणजे
शब्द ही पडती अपुरे
दोन मने जुळायला
प्रेमाची एकच जाणीव पुरे
******************************
प्रेम कुठे ही जात नाही,
ते हृदयात कायम असत.
मनालाच वाटत उगाच ,
ते प्रेम कधी कमी आहे, कधी जास्त !!
******************************
खरे प्रेम कधीच मनातून काढून टाकता येत नाही,
पण का? प्रेम केलेल्या व्यकती ला ही थांबवता येत नाही,
खरे प्रेम करताना ते कधीच मोजून-मापून होत नाही
तरी का मनाला ते वाटते,प्रेम.. कधी कमी, कधी जास्त.....!!
******************************
मन न ,खुप चंचल असत,
दिसली हिरवल, की घुसनार्या वासरासारख ,
बांध घातला तरी, वाट फुटेल तिथे
वाहात राहणार्या पान्यासार्ख....
म्हणुनच त्याला प्रेमाची
जास्त कमी महसूस होते,
प्रेम अविचल असत हृदयात, तरी
मन उगाचच कासाविस होते.........
******************************
मन कासविस होते......
जेव्हा वार्या सारखे वाहूनही हिरवळ मिळत नाही..!!
मन कासविस होते.......
जेव्हा पाण्यासारखे वाहूनही किनारा मिळत नाही...!!
मन कासविस होते......
जेव्हा मनाला चाहूल लागते ह्दय तडकण्याची.....!!
******************************
मनातच असू दे रे मनाची हालत
दुनियेसमोर सांगू नका
सर्वांसमोर सांगून त्याला
चार चौघात लाजवू नका
******************************
सोमवार, २७ एप्रिल, २००९
चारोळी
११:०९:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा