Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, २७ एप्रिल, २००९

चारोळी

Share

मन असत आपल नाजुक ,
सुकुमार आणि अलवार ,
दुखवल, तर घालायची आपणच ,
त्यावर फुंकर हलुवार.............

******************************

वेदनांवर त्याचा आपण
कशी फुंकर घालणार
सांग, पण मनाच्या मनातलं
आपण कसं जाणणार

******************************

मनाला पण मन असत ?
हे प्रथमच कलल मला ....
चल , जाउन शोधते मी,
माझ्या मनातल्या मनाला !

******************************

नक्कीच सापडेल जर
तुझ्याकडे असेल तर
कदाचित सापडणार ही नाही
कुणाला दिले असेल तर

******************************

खरच, मन नाही, अस वाटतय,
फार पूर्वी दिलेल रे , एकाला , जपून ठेवायला ,
परत घेतल्याचे आठवत नाही,
जर असेल परतलेल माझ्याकडे,
तर इथेच ठेवतो ,
आता त्याला कुठे पाठवत नाही.

******************************

कळत नाही मन कुठे गेले होते
गाव चुकीचे होते, की रस्ता चुकीचा होता
विचारून घे एकदा त्याला
नाव चुकीचं होतं, की पत्ता चुकीचा होता

******************************

अरे,मनाला कुठल माहित नाव अणि गाव ,
एक अनामिक ओढीने गेल धावून ,
भेटीने सुखावल्यावर, राहिल तिथेच ,
आता नाही येत परतवून ......

******************************

अग पण त्याच्या शिवाय
करमेल का तुला ?
मोकळ्या मनाने एकटे रहायला
जमेल का तुला ?

******************************

जपल्या होत्या मी किती आठवणी
एकुनेक पुसून गेली आहे
तुझ्या एकटीचीच आठवण फ़क्त
आठवणीत राहिली आहे

******************************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top