Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

सकाळ

Share

सकाळ होते, तो उठतो
पाऊस थांबला असतो
तो उभा राहात नाही
तो चालायचं ठरवतो

चिल्खतावरचे डाग काढतो
अंगावरची घाण झटकतो
मेंदू पुसून स्वच्छ करतो
तो चालायचं ठरवतो

कुठे जायचं ते माहित नाही
परत चालता येत नाही
पण वीर थांबत नाहीत
म्हणून तो पण थांबत नाही
आकाशाकडे ध्येय मागतो
तो चालायचं ठरवतो

सुरवातीला थोडा लडखडतो
दिशा शोधतो, अंत शोधतो
अंताकडे जायचा रस्ता मांडतो
शेवटी तो चालायला लागतो

उत्साह परत येतो
आत्मविश्वास परत येतो
अभिमान परत येतो
तो एनिमसजचा वीर असतो
तो चालायला लागतो

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top