Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, २७ एप्रिल, २००९

चारोळी

Share

सावली मिळते तेंव्हा जाणवत ,
उन्हाची काय तलखी असते ,
तुफान गर्दीतही जाणवत ,
की आपली एकांडीच एक पालखी असते .

******************************

कुणी एकाकी ना निघून जावे
येईल त्याला सोबत न्यावे
उन्हात ही, चालेल रस्ता पुढे
आपण त्याच्या पाठी चालावे

******************************

चालता चालता अडखळलो
यात मला दोष कशाला ?
जाणतो, कुणी पेरले दगड रस्त्यात
आपल्याच माणसावर रोष कशाला ?

******************************

येईल त्याला सोबत घेणे,
मनाला काही पटत नाही ,
अनामिक भीतीचा पगडा ,
काही केल्या सुटत नाही...

******************************

अग एकटी गेलीस तर
ख़रच एकटी पडशील
एकांतात कुणाच्या खांद्यावर
डोकं ठेवून रडशील ?

******************************

पावल नेहमी जपून टाकावी,
ठेच लागली ,तर शहाणा व्हाव ,
दिसत नसेल रस्ता साफ़ ,
तर चश्मा पुसून पहाण व्हाव .....

******************************

रस्ता पाहनं होतच नाही
तू समोर दिसलीस की
चश्मा पुसनं होतच नाही
तू सोबत बसलीस की

******************************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top