आरक्षणही आरक्षण गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली पोट भरे;
वायूसंगे रोग फिरे;
नभात भरला
दिशात फिरला
जगात उरला
रोग पसरतो चोहिकडे
आनंदी- आनंद गडे
आरक्षण सोनेरी हे
कोणासही हसवते आहे,
भुलली विद्या परिणामे
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले,
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही आरक्षण गडे!
दिल्लिमधि ना क्षेत्र असे
डोकाउनी हे पाहतसे;
कशास बघते? डोक्याला! (छे: छे:)
मंडल भेटला का त्याला?
जयामधे जो
सदैव बसतो
सूखे विहरतो
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही- आरक्षण गडे!
वाहते रुधिर मंदगती
जळती लतिका लक्षावधि
पक्षी मनोहर कूजित रे
कोणाला सांगतात बरे?
कोमल हे सगळे,
भर भर मारले डौलात पडले,
इकडे तिकडे चोहिकडे
अनागोंदीही आनंद असे
'अर्था'च्या बोज्यात
किती पोरे मरतात
त्यांना प्रतोद असा मीळतो
सोडून 'अर्था' तो जातो
वेष संपला
सत्वर मेला
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही आरक्षण गडे
बुधवार, २९ एप्रिल, २००९
आरक्षणही आरक्षण गडे
२:१४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा