प्रकाशाच्या सूक्ष्म कणा
तिमिराच्या गर्भात लोपलेल्या
प्रकाशाच्या सूक्ष्म कणा
उठ जागा हो
उसळून ये चिरीत अन्धाराचे काळीज
आणि करून टाक सारा आसमन्त तेजाने झळाळणारा
विच्छीन्न कर सारी गावे
अन्धाराच्या साम्राज्याने माखलेली
आणी दे प्रकाश शलाका त्या चिमुरड्यान्च्या चेहेर्यावर
ज्यान्च कोमेजतय बालपण
त्या उन्मत्त काळ्या उकिरड्यात
उजळून टाक ती तम विहीर
मूक आक्रोशाने निनादलेली
आणी सार्थ कर त्यान्च निरपराधित्व
धुवून टाक त्यान्च्यावरचा कलन्क
बरसून अगणित प्रकाश रेषा
प्रकाशाच्या सूक्श्म कणा
विसरू नकोस तु तुझ कार्य
विसरू नकोस कधीच
जरी आहेस तु अति सूक्श्म
तुझ्यात्च आहे शक्ती
अन्धाराला मात देण्याची
उठ, जागा हो
बरसू देत अगणीत तेजो धारा
आणी लयास जाऊदे अन्धार सारा
बुधवार, २९ एप्रिल, २००९
प्रकाशाच्या सूक्ष्म कणा
२:१६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा