देऊळ बांधीले तुला ( गझल )
देऊळ बांधीले तुला, अन दगड तू झाली सखे
तोडीत राहीले फुले, काटेच तू झाली सखे
खोदीत राहीलो उगा, नाही झरा कोठे मला
शोधीत राहीलो तुला, तृष्णाच झाली तू सखे
फोडीत राहीलो दगड, नेण्यास मेणा हा तुझा
वाटेत माझ्या आडवा , पाहाड झाली तू सखे
लावीत गेलो झाड मी , ती सावली वाटेवरी
पाहावले नाही तुला, कुर्हाड झाली तू सखे
स्वप्नात पाहीली कधी, तुझ्यासवे मी काटतो
जाळीत मज मी चालतो, ती वाट झाली तू सखे
बुधवार, २९ एप्रिल, २००९
देऊळ बांधीले तुला
२:१६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा