एनिमसजचा वीर
जंगलात एक एकटी वाट
वरून पडता पाऊस
भोवती झाडी आणि धोका
जंगली प्राणी आणि त्यांचे आवाज
या सगळ्यांच्या मध्यात
डोळ्यात वीज आणि डोक्यात वादळ घेऊन
तो एकटाच उभा असतो
हातात ढाल आणि तलवार
अंगावर भिजलेल्या चिल्खताचा भार
शरीर आणि मनाला कसलाच नाही आधार
डोक्यातल्या वादळाला नाही सुमार
तरीही तो एकटाच उभा असतो
तो हलत नाही
तलवार हलत नाही
ढाल हलत नाही
विचार चालू असतात
मन धावत असतं
तो तसाच एकटाच उभा असतो
मी काय केलं, कुठे चूकलो
जे झालं ते का झालं
भविष्यात हे कसं टाळता येईल
आता पुढे मी काय करु
इथून कुठे जाऊ
हे स्वत:ला विचारत
तो दु:खात एकटाच उभा असतो
जे झालं ते धुऊन टाकायला
तो पावसात उभा असतो
जे झालं ते धुऊन टाकायला
हा पाऊस पुरेसा पडेल का?
हा पण विचार डोक्यात डोकावतो
हे एक वाईट स्वप्न तर नाही ना
हे बघायला तो तलवारीवर बोट घासतो
बोटातलं रक्त खरं आहे
जे झालं ते, जे होतय ते,
जे होणार आहे ते
सगळं सगळं खरं आहे
पण मला दु:ख का होत नाही
रक्त निघालय बोटातून तरी
मेंदू त्याच्याकडे लक्ष का देत नाही?
हे विचारत, एकटाच उभा असतो
दर लढाई नंतर हे का होतं
जीवनाला अर्थ नाही असं वाटतं
अस्थित्त्व हदर्ल्यासारखं वाटतं
आणि सगळं शांत, सून्न पडतं
उद्या सकाळी सूर्य परत उगवेल
रोज जे होतं ते होईल
पण मी कालच्या ’मी’ सारखाच असेन का?
आणि नसलो तर कसा असेन?
डोळे मिटतात आणि तो
जिथे उभा असतो तिथेच
डोळ्यात वीज आणि डोक्यात वादळ ठेऊन
हातात ढाल-तलवार घेऊन
एकटाच झोपतो
बुधवार, २९ एप्रिल, २००९
एनिमसजचा वीर
२:१२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा