Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

बदल

Share

जग बदलत असतं
लोकं बदलत असतात
काळाचं चक्र फिरत असतं
मनातले विचार बदलत असतात

तो तलवार दगडावर रगडतो
ढाल घासून चमकवतो
चिल्खत स्वच्छ ठेवतो
हेच त्याचे मित्र असतात
लढाईत सोबत असतात
तो त्यांच्यावर प्रेम करतो
त्यांना जपतो, आदर देतो

नदीत उडी मारतो
स्नान करतो, अंग स्वच्छ ठेवतो
जखमांवर औषध लावतो
शरीरयंत्राची दुरूस्ती करतो

शरीरानंतर मनाकडे लक्ष देतो
विचारांवर काबू ठेवतो
चांगले विचार मनात ठेवतो
वाईट काढून टाकतो
मनाची बाग टाप - टीप ठेवतो
त्यात पाणी आणि खत पुरवतो

तो स्वत:कडे लक्ष देतो
सतत सुधारणा करतो
तो बदल स्विकारतो

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top