'लव' की प्रेम?'
लव' शब्दच कीती पोकळ,
'प्रेम' शब्दातच कीती बळ.
'लव' एक बेछुट अंधानुकरण,
'प्रेम' एक अतुट बंधन.
'लव' मनांची फ़सवणुक,
'प्रेम' मनांची जपणूक.
'लव' कोमेजलेला गंध,
'प्रेम' दर्वळलेला सुगंध.
'लव' नसमजून बोलणं,
'प्रेम' नबोलून समजणं.
'लव' मेसेज सरकवणं,
'प्रेम' मेसेज बनणं.
'लव' आंधळ करतं,
'प्रेम' बघायला शिकवतं.
म्हणूनच,'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,
'प्रेम' असलं तर सारकाही असतं,
'प्रेम' असलं तर जग असतं.
तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?
'लव' की 'प्रेम'!
रविवार, १९ एप्रिल, २००९
'लव' की प्रेम?'
२:००:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा