चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
हिरव्या हिरव्या रांनात,
तुझ्या भिजर्या मनात,
गंध फुलांचा मोहरला
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
पिवळ्या पिवळ्या उन्हात,
तुझ्या सावलीच्या आसर्यात
गारवा क्षणाचा मला लाभला
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
गुलाबी गुलाबी ओठांत
गोडीच्या संजिवनी मधात
देह माझा लाजला
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
ओल्या ओल्या पावसात,
मातीच्या त्या सुगंधात,
एक थेंब होऊनी तुझ्यावर पडला
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला...
शहार्याच्या बोचर्या थंडीत,
वाहतो वारा एका मंदीत,
हाथ तुझा झुळूक होऊनी चेहर्यावरी फिरला
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला...
प्रितीच्या पहिल्या मिलनात,
तो तुझा हाथ धरला माझ्या हातात
अन लाजली खळी तुझ्या गोर्या गालात..
अन चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
रविवार, १९ एप्रिल, २००९
चेहरा तुझा माझ्या मनात भरला..
२:००:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा