Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २६ एप्रिल, २००९

ती पतंग उडवणे सोडले

Share


मस्त झोपाळ्यांच्या त्या बागेत जाणे सोडून दिले.
चोरुन निवडून ओंजळभर कळ्या जमवणे सोडून दिले.

मोठ्या आशेने निवडून
मोत्यांच्या मुठी भरून
बालपणाने सजवले होते.
महत्वकांक्षेच्या वादळाणे
ते वाळूचे घरटे तोडले.

रंगासंगे उधळत होती
कधी पडत कधी तुटत होती
नव तंतूंसंगे पुन्हा नभी भरारती
घॊर निळ्या छायेत आता
ती पतंग उडवणे सोडले.

किती विषय होते बोलायला
शब्दो शब्दी हसायला
सर्व तालस्वरी पद थिरकती
आणि चलता चलता आशा गाती
स्वप्न स्पंदणाच्या चालीवर
आता विना विनंती मैफिलीत
ते गीत गाणे सोडून दिले.

ना आस ना शोध कोणते
ना ध्येय ना मार्ग कोणते
फक्त सरळ चालायचे.
मला माझ्या रस्त्यावर असा रस्ताच मी निवडलाय.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top