Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २६ एप्रिल, २००९

अश्रूधारांच्या मेधदाटे

Share

अश्रूधारांच्या मेधदाटे,
हास्याच्या उजळ पहाटे,
आम्ही तुलाच पाहिले
असो रात वा उजळे

पडकी घरे पुन्हा बांधता,
रोज नवा बाजार मांडता,
आम्ही तुलाच पाहिले,
रोज ऊठता बसता,

दुखःदायी जाळ्यांमध्ये,
हारातल्या कळ्यांमध्ये,
आम्ही तुलाच पाहिले,
पाप आणि पुण्यामध्ये,

पाथरवटाच्या चिऱ्यात,
खाटकाच्या सुऱ्यात,
आम्ही तुलाच पाहिले,
जिवनिर्जीव चराचरात.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top