तू नेहमीच माझ्या जवळ असतोस
खूप खूप बोलतोस आणि मी हसतो
कधी मी बोलतो तु हसतोस.
मला आहे खात्री हा नाही भास.
तु जवळ असताना वाटत इतर कुणिच नसावे
पण तुच असतोस सर्वत्र द्वैत काहीच नसते
पण मला आहे खात्री हा नाही भास
कधी मला वाटले तुझ्या पसून दूर पळवे
पण माझ्या आतही तूच, हे कितिंदा कळावे
पण मला आहे खात्री हा नाही भास
रज तमाचा विटाळ केला, सत्वाचा धरला हेला
आराधण तुझी करता तुच मला सोडूण गेला
पुण्यपापाचा करता भेद तू दूर उभा राहीला.
अंतः बाह्य मग मी अंहकारी होरपाळला
माझे काहीच उरले नाही. देह कधीच हरवला मही
कर्म करता प्रवाही विकल्प उरला नाही.
आता आपपर भाव सत्व रज तम भेद नाही
भोज्य भोक्त निमित्त कर्म तूच सर्व पाही
तु इतका सर्वत्र राही की तु माझ्यशिवाय उरलाच नाही.
रविवार, २६ एप्रिल, २००९
तू नेहमीच माझ्या जवळ असतोस
९:३६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा