Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २६ एप्रिल, २००९

कर्मयोग

Share


जळत्या श्वासांमध्ये मी सितार वाजवतो
आश्रूंच्या वर्षावात मी मेघमल्हार गातो
लक्ष विराणे असले म्हणुन काय झाले
मझे लक्ष केवळ वसंत ऋतू असतो.

लोपतील माझे इरादे, आहेत इतकी संकटे?
जीवन मृत्यु समासे मग भय का वाटे
लाटांशी जरी खेळती तिव्र वादळे
धैर्याहाती सोपवली नौकेची वल्हे

थेंबा थेंबास शीनलेल्या चातकात
कातळ फोडत्या काबाड कष्टात
सुख स्वतःच्याच स्वेदगंधात
त्याचेच कारंजे अयुष्यवटिकेत

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top