पाहीले मी पाचोळ्याला फांद्याना लटकून रडताना,जगताना तर कधी फुलण्याआधी कळी गळून पडताना ऐन बहरात फुलांचा रंग उडून जाताना अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला गंध ओवळून टाकताना पाहीले मी डेरेदार वृक्षाखाली सावली हरवून जाताना तर कुठे इवल्या रोपाखाली वारूळ उभे रहाताना वादळाशी झूंज देत इतिहास नवा रचताना तर कुणी अलवार झूळकीसरशी मुळासकट पडताना पाहीले मी देवळात दगडावर अभीषेक दुधाचा होताना तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात अन्कुर उद्याचा फुटताना खडकाळ बंजर जमीनीवर नांगर यत्नाच फिरताना तर कुठे नर्मदेच्या तीरावर गोट्यांचे पीक येताना पाहीले मी हिमालयाला नतमस्तक धरेसमोर होताना तर कधी इवल्या शीळेला मिजास उंचीची मारताना कुणी उगीच ढगात बोट घालून देवांशी नाते सांगताना तर कुठे कुण्या रामाच्या संजीवनीसाठी भार सारा वीसरताना पहातोय मी सचेतनात अचेतन तितकेच भरून आहे निर्मळ भागीरथीच्या संगे गटारगंगा दडुन वाहे असेच सर्व पहता पहता डोळे क्षणभर मीटून घेतो गोल खोल गुढ जगाची खडकाळ रीत समजुन घेतो |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
पाहीले मी पाचोळ्याला
५:०३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा