Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, १७ जून, २०१०

हो ना .... तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात

Share

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.
तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.
तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते.
हो ना .... तर मग तुम्ही प्रेमात पडला आहात .
तुम्हाला हसवणारा कोणीतरी तिथे आहे,तरी तुमचे लक्ष कोणत्या तरी खास व्यक्तिकडे आसते
तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .
खर तर त्याने खुप आधीच तुम्हाला येण्याचे वर्दी दयाला हवी होती,
पण तुमचा फोन वाजताच नाही,पण तुम्ही मात्र त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहत असता,तर मग शंकाच नाही तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात .

मेलबोक्स/इनबोक्स मध्ये त्याचे/ तिचे भरपूर मेसेज आहेत
सारखे सारखे भाघावायाचे वाटतात,क्यापेसिटी संपली तरी ते मेसेज डिलीट करावयाचे वाटत नहीं,
तेव्हा तुम्ही त्यांचा प्रेमात पडला आहात .

"
तो/ती फक्त माझा/माझी चांगला/चांगली मित्र/मैत्रिण आहे",तुम्ही अस सगळ्याना नेहमी सांगत असता,
तरी त्याचे/तिचे विचार टालता येत नाही,म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला आहात .
हे वाचतानाही मनात कोणीतरी डोकावत नाही ना?तर. . . तर. . . तर. . .
लाजुन हसू नका, तुम्ही खरोखरच त्यांच्या प्रेमात पडला आहात .

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top