Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, १७ जून, २०१०

प्रेमासाठी वेचलेले मी…

Share

प्रेमासाठी वेचलेले मी,या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .
उडाली पाखरे घरट्यातुनि , साद घालती भविष्याला
मनी सतत तिच्याच आठवणी,दोष का वेड्या मनाला ?
ओढ कसली तरी अनामिक,आठवणींच्या रेशमी धाग्यांना ………..
भेटली अशीच ती पर्वानंतर,वाचा फुटली नजरेला
वेचला होता मकरंद आपण एकाच प्रेम-फुलातला
चोरुनी नजरा तिने दिली कबुली, हवास तूच या डोळ्यांना !! ……..
शब्दही सुचले सूरही जुळले, गावे कसे या गीताला ?
व्यक्त करावे प्रेम कसे ? उत्तर नसते या कोड्याला
अडखळली परत ही वाचा म्हणून, कवितेत उतरविले शब्दांना ………..
 
प्रेमासाठी वेचलेले मी , या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .
============ ========= ========= ====

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top