| उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे. उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस "सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील" बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील "कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील. पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय. |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
रंग बदलेस म्हणून
२:३७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा