जगणे हे कशासाठी माझे
ध्यास हा कसला मजला
माझ्याच हाताने गुम्फला
मी कोष एकटेपणाचा
धरून आईचा पदर
पाउल टाकले या जगात
तिचाच हात हाती घेऊन
चाललो ही दुर्गम वाट
पन्खात आले बळ मारली भरारी
वृद्धाश्रमाची खोली आली मातेच्या पदरी
वडिलान्ची कठोर माया
शिकलो ताठ कण्याने जगाया
प्रसन्गी केले ताडन तरीही
बनलो खम्बीर मनाने रहाया
आत्मविश्वास जागृत झाला गेलो समुद्रापार
वडिलान्च्या नशिबी मात्र जुन्या काठीचा आधार
मित्र-मैत्रिणिन्नि दिली साथ
अनेक सुख दुख वाटून घ्याया
त्यान्च्याच सोबतीने चढलो
उत्तुन्ग यशाच्या अनेक पायर्या
अहन्कार मनी वसला झालो लाटान्वर स्वार
मित्रानाही विसरलो मैत्रीवर केले अगणित प्रहार
नोकरीतले सहकारी
जणू सख्खे सगे सोयरे
त्यान्च्याच मदतीने पार केली
प्रमोशनची अनेक शिखरे
" मी" पणाचा भाव झाला उच्च समजलो स्वताला
सहकार्याना तुच्छ लेखले लावले पाय चाटायला
दिवस फिरले सर्व जण सोडून गेले
उरलो मीच माझ्या सोबतीला
माझ्याच हाताने मी उभारला
भोवती एकान्ताचा कडा
आता समजलो सारे सारे व्यर्थ आहे
पैसा काय कमाचा रे माणसाला महत्व आहे
फिरतो वणवण अखन्ड शोधीत प्रेमाला
पारखा रे झालो मीच माझ्या सावलीला
सोमवार, ६ जुलै, २००९
जगणे
१:३७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा