Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

कधी तू असा अबोल की..

Share

कधी तू असा अबोल की..
वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,
की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?

कधी तू असा बोलका की..
वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,
की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?

कधी तू असा शांत की..
वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,
की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?

कधी तू असा अशांत की..
वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,
की,आगीशी संग मी करत तर नाही ?

कधी तू इतका जवळ की..
वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,
की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?

कधी तू इतका दूर की..
वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,
की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?

कधी तू असा..कधी तू तसा..
वाटतो तरीही, मला हवाहवासा,
की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?

पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top