पुन्हा एकदा तुला आठवणीत भेटते
माझ्यातल्या तुला हृदयात कवटाळते
डोळे वाहून जातात क्षणाची साठवण करताना…
पुन्हा एकदा मनापासून रडाव म्हणते….!!!!
मनाची तगमग सारी....अन जीवाची घालमेल
कितीही सावरलं तरी पुन्हा बरबाद होते
नीरव शांततेतुन आवाजाचा शोध घेताना….
पुन्हा एकदा आयुष्याशी जगाव म्हणते....!!!!
उमजे न मनाला आता थांबायचे तरी कुठे
वाट तुडवत जायचे एवढेच फ़क्त जाणते
दमछाकच निव्वळ जीवाची….पायवाट सरताना….
पुन्हा एकदा विसव्याला थांबावं म्हणते….!!!!
तुला न भेटताही का घ्यावा सतत तुझाच ध्यास
तुझ्या ह्या ध्यासातुन मी प्रत्येक रात्र हरवते
विचारांच्या गर्दीतून अशा उत्तररात्री विझताना....
पुन्हा एकदा गोंडस स्वप्न पहाव म्हणते….!!!!
तुझा अनुभव जणू दरवळणारा सुगंधच
संभाषण रंगते अजुनही विसरून अस्तित्व जगाचे
तुझ्या त्या आवाजाचा पाठलाग करताना….
पुन्हा एकदा स्वतःला हरवावं म्हणते….!!!!
उर भरून येतो रे सख्या आता शब्दही अडतो
वाहणारया श्रावणाला पापणीतच रोखते
तुझ्या सुखाच्या ओंजळीसाठी हात जोडताना….
पुन्हा एकदा तुला मागावं म्हणते.....!!!!!!
गुरुवार, ४ जून, २००९
पुन्हा एकदा..!!
५:५२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा