Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

घरसंसार....माझी कविता !!!!

Share

घर हे दोघांच असतं,
ते दोघांनीच सावरायचं असतं,
एकाने पसरवलं,
तर दुसरयाने आवरायचं असतं;
एकाने पाडलं,
तर दुसरयाने उभारायचं असतं;
एकाने तोडलं,
तर दुसरयाने जोडायचं असतं.....!!!!

या साठी गरज असते,
ती दोघांच्या एक-मताची,
"त्या" दोघांच्या एकतेची,
दोघांनी एकमेकांना सांभाळण्याची,
दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची,
मांडलेल्या संसारात,
प्रामाणिकपणे दोघांची मने रमण्याची....!!!!

दोघांची मने रमली,
तर पसरलेल्या घरालाही
लवकरच आकार मिळतो;
अन्यथा, चांगल्यातला चांगला संसारही
अधिकच विखुरतो....!!!!

म्हणूनच म्हणतो -
"रमाचे मन रमले नाही,
तर रामाने मन रमवावं,
आणि जर रामाचे मन रमले नाही,
तर रमाने मन रमवावं "...!!!!

एखाद्यावेळेस यातूनच,
दोघांची मने पुन्हा जुळतातहि,
दोघे एकमेकांना मिळतातहि,
कोलमडलेल्या घराला,
छानसा नवीन आकार येतो
आणि
आनंदाने भरलेल्या संसाराचा
नव्याने उदय होतो....!!!!

कदाचित म्हणूनच असं म्हणतात की -
"ईमारत बांधायला वेळ लागतो असं नाही,
घर बांधायला वेळ लागतो;
घरासाठी दोन जीवांचा,
खराखुरा मेळ लागतो "....!!!!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top