आठवतो का तो वेडा मुलगा?
तुझ्याबरोबर क्लासमधे शिकायचा,
तू येण्याआधी गेटवर
वाट पहात बसायचा..
तुझ्यामागे नजर झुकवून
हळु हळु जिना चढायचा,
तुझ्या सँडलजवळ त्याची चप्पल
जरा चिटकवुनच काढायचा..
आठवतो का तो वेडा मुलगा?
बाईँचा खुप ओरडा खायचा
लक्ष कधी लागलंच नाही त्याचं
चोरुन फक्त तुलाच पहायचा..
आठवतो का तो वेडा मुलगा?
क्लास सुटल्यावर तुझ्या मागे यायचा
तुझ्याशी बोलण्याचा रोज
एक निष्फळ प्रयत्न करायचा..
हा तोच! तोच मुलगा!
तो आजही तुझ्यावरच प्रेम करतोय...
गुरुवार, ४ जून, २००९
***तो आजही तुझ्यावरच प्रेम करतोय***
५:२८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा