Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

***नुकतेच प्रेमात पडल्यावर***

Share

कधी कधी आपल्याला काहीच सुचत नाही..
मन कुठं तरी गुंतून पडतं..
कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही..
आपण स्वत:शीच बडबडतो..
मनात 'कुछ कुछ होता है' च्या भावना निर्माण होतात..
तिच्या स्वप्नात राजकुमार येतो तर त्याच्या स्वप्नात अप्सरा येते..
तेव्हा आपण कुणाच्या तरी प्रेमात पडलो असून,
आपल्या आयुष्यात 'कुछ कुछ नही, बहूत कुछ हुआ है' यांची जाणीव आपल्याला होत असते...

अडीच अक्षराचे 'प्रेम' सुरवातीला समजायला फारच कठीण जात असते.
कारण आपण तेव्हा प्रेमाच्या पहिल्या वर्गात प्रवेश केलाला असतो.
प्रेमाच्या विश्वात आपले पहिले पाऊल असेल तर आपण पार गोंधळून जातो.
सुरवातीला तर काहीच कळत नाही की हे काय सुरू आहे.
'त्याच्या' किंवा 'तिच्या' पहिल्या भेटीतच आपल्या जीवनात 'प्रेमाचा बहर' यायला लागतो.
सारे जीवन बदलून जाते.
'तो' किंवा 'ती' दिसली नाही की, पाण्याविना मासा अशी आपली अवस्था होते.

आधी तर असे कधी झाले नाही. मग आताच का?
असं का होतय, असे कोडे आपल्याला पडते.
याला कुठला आजार म्हणावा? आपल्याला 'लव्ह फिवर' तर झाला नाही ना?
असा प्रश्न आपल्याला पडणे सहाजिकच आहे.
असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात पिंगा घालू लागतात.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top