Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

मला तर हवा असतो फक्त पाउस..

Share

मला तर हवा असतो फक्त पाउस..

मला तर हवा असतो फक्त पाउस,
तुलाच लागते छत्री - रेनकोट

मला आवडत चिंब भिजायला
तुलाच लागत, आडोश्याला उभ राहायला

मला आवडतो पाउस केसात मुरणारा
तुलाच लागतो रुमाल, केस पुसायला

मला नाचावसं वाटत बरसणाऱ्या पावसात
तुलाच लागते सिगारेट, भिजत ओढायला

मला भुरळ घालतो घुमणारा वारा
तुलाच लागतो बंद खोलीचा किनारा

पण तरीही कधीतरी भिजतोस तु..
माझ्यासाठी पावसात उतरतोस तु
वाफाळलेला चहा सोडुन
“अमॄत”धारा पितोस तु..
खरच मनापासुन आवडतोस तु..
जेव्हां पावसासारखा बरसतोस तु ..
जेव्हां माझ्यासाठी भिजतोस तु ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top