Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

परकेपणा

Share

परकेपणा जाणवतोय खरा
पण काही बोलु शकत नाही मी ..
एक मौन माझ्यातही अगदी बेभान होऊन वाहतय
तुला मौन उमगत का ?
जर असेल तर मी बोलल्याच कळेलच तुला
नाहीतर जाणवेल फक्त एकेरी शांतता ..
बोललीस तर तु पण नाही आणी मी पण ..
बोलले फक्त उरात भरल्या गेलेले खोल श्वास ..
काही स्पंदने, तुझी - माझी नजर
आणी ओघळते अश्रु ..
सई, ... एक ठेच लागली खरी
पण वेदना तत्पुर्वीच उमटली होती
तो दगड अगोदरच वाट बघत उभा होता जणु वाटेवर
का कुणास ठाऊक ??
पण माझ्या अंगठ्यातुन वाहणार रक्त मात्र ..
वेदना सोडत नव्हतच मुळात,
आणी मागे मात्र तुझा उमटलेला हुंकार अजुन आठवतो ..

मला लागलेल्या ठेचेने तुझं मन तर तुटल नाही ना ?
नको करुस पुन्हा असं ..
वेडी होशील, माझ्यासारखी .. माझ्या कवितांसारखी ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top