Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

दारूबाजाचे डायग्नॉसिस

Share


पार्टीत तुम्ही दारू पित आहात. तीन-साडेतीन पेग झालेले आहेत. अशात अचानक प्रकृतीत बिघाड होतो. या बिघाडाची लक्षणे काय असतात आणि त्यातून काय रोगनिदान होते, पाहा!


१.लक्षण : तुमचे पाय थंड पडतात आणि घाम सुटल्यासारखे वाटते.

निदान : तुमचा ग्लास तिरपा झाला आहे आणि बर्फगार दारू तुमच्या बुटावर सांडून आत शिरली आहे.

उपाय : ग्लासचे तोंड वरच्या बाजूला येईल, अशा रीतीने तो धरण्याचा प्रयत्न करा.


२.लक्षण : तुमच्या समोरच्या भिंतीवर झुंबर, ट्युबलाइट, दिवे दिसत आहेत.

निदान : तुम्ही टाइट होऊन कम्प्लीट आडवे झाले आहात आणि तुमच्यासमोर आहे ती भिंत नसून छत आहे.

उपाय : कमरेच्या वरच्या भागाला प्रयत्नपूर्वक ९० अंशाच्या कोनात आणा. कशाचा तरी आधार शोधून सरळ उभे होण्याचा प्रयत्न करा.


३.लक्षण : जमीन अंधुक अंधुक दिसू लागली आहे.

निदान : तुम्ही रिकाम्या ग्लासातून जमिनीकडे पाहताय.

उपाय : सोप्पा... ताबडतोब ग्लास भरून घ्या

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top