Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

असे चिंब ओले कुणी पाहिलेले

Share


सुगंधात न्हाले असे रान ओले
कुणी पाहिले ते कुणाला कळाले
इथे आर्त दंवबिंदू गालास चुंबी
कुणी पाहिले ते कुणाला कळाले

लपे डोंगराआड लाजून चंदा
निशा गोड त्याने अशी पाहिलेली
किती रम्य असते असे जागणे रे
कुणी पाहिले ते कुणाला कळाले

असा न्हायलेला तू बाहेर येता
सुगंधी बने श्वास निश्वास घेता
मुलायम उसासाही छळतो कसासा
कुणी पाहिले ते कुणाला कळाले

असे रक्त रंगीत येते भरात
जसे रंग गालावरी सांडतात
कुणा वेड लावी कुठे जीव जाई
कुणी पाहिले ते कुणाला कळाले

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top