Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

थांग

Share


षडजाच्या मनाचे थांग कोणाला कळावे रे
ऋषभाला कुणि सांगेल का कोठे न गावे रे

कधी उसन्या स्वरांची साथ येता गीतही बनते
कधी येथे तरसते गीत ज्याचे नाव व्हावे रे

कडीकुलपात त्यांनी ठेवले होते असे काही
सुगंधाने तरीही चोरुनी सारे कथावे रे

अशा अलवार वेळी काळजाचे शिंपता पाणी
कुठे यमकात होते चूक पण छंदा जुळावे रे

भले अगतिक ना झाले कधीही या जीवासाठी
जिवाचे होऊ दे काही जिवाला जीव द्यावे रे

पुरे झाले स्वरांगी आज गाणे मौन होऊ दे
मिळावे नाम कोणाला, कुणा काटे सलावे रे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top