Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

िवरह

Share


http://images.santoshbadgujar.multiply.com/attachment/0/SCbe6AoKCEQAAArdgl01/ATT00014.jpg?nmid=95488597
सांज उदास रुपेरी
सखा दुर देशी गेला
मन हलके भरले
कसा डोळा ओलावला ??

कसा साहु विरह मी ?
कशी आठवण बोलु ?
कसा चांदही नभात
पौर्णिमेचा हरवला

बाई सोय ना मनाला
कसे गाऊ गीत ओठी
याद सलते सख्याची
जीव कसा कासावला ?

दारी आला माझा धनी
दॄष्ट कशाने मी काढू ?
प्राण ओवाळुन घेते
लाज फुलली गालाला..

मन हलके भरले
कसा डोळा ओलावला ??

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top