फितुर झाले जरी चांदणे
रात बोलते माझ्याशी
स्पर्शातुन ती उतरत येते
मुक्त हासते माझ्याशी
रात्रच आहे जरी सोबती
खरी सखी ती माझी गं
अंधारातुन जन्म घालते
किती किती नवलाई गं ?
कधी चांदणे कोमल होऊन
स्पर्शांतुन मज जाणवते
रातराणीचा गंध बनुनी
कधी रात मज बोलवते
रातच असते खरी सोबती
दिवसादेखील मजला गं
अंधाराची मला भिती ना
रातच सोबत मजला गं
मला आवडे स्पर्श चांदणी
अंगावरती फिरणारे
आईच्या मायेने हलके
गीत नव्याने गाणारे
शुक्रवार, २९ मे, २००९
स्पर्श चांदणी ...
४:४१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: अंधार , कविता , चांदण , मराठी कविता , रात्र , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: अंधार , कविता , चांदण , मराठी कविता , रात्र , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा