मी गर्व गीत गाते
गंधर्व गीत गाते
पाहून बिंब माझे
मनरम्य गीत गाते
डोळ्यांत काजळाचे
हळुवारसे इशारे
ओठांस रिझवणारे
हे सांद्र धुंद वारे
श्वासांत गुंफ़लेले
निश्वास गीत गाते
...मी गर्व गीत गाते
...गंधर्व गीत गाते
हे मंद चालणे मी
गंगेकडून घेते
सर्वांग चांदणे हे
चंद्राकडून घेते
केसांत माळलेले
मी गंधगीत गाते
...मी गर्व गीत गाते
...गंधर्व गीत गाते
मानेत गर्व माझ्या
ती लाट समुद्राची
ताठा मनात माझ्या
ती भेट हिमाद्रीची
आयुष्य युद्ध माझे
झुंजार गीत गाते
...मी गर्व गीत गाते
...गंधर्व गीत गाते
शुक्रवार, २९ मे, २००९
मी गर्व गीत गाते
३:३२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा