डोळ्यातुनी प्रियेच्या मी नूर होत गेलो
झालीच ती कविता, मी सूर होत गेलो
हलकेच भान आले, केसात मोगऱ्याचे
ती गंध होत गेली, मी फूल होत गेलो ..
पहिलाच स्पर्श गाली, होता असा रुपेरी
ओठांतुनी स्वतःच्या, मी चूर होत गेलो ..
बेभान काय जादु, होती तिची अशी की
ती पुल होत गेली, मी पूर होत गेलो ..




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा