Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

आई साठी कसे लिहू,

Share

आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी.......

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल........

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top