ठाऊक आहे आज मी कपारीचा पाझर आहे,
पण उद्याला प्रीतीचा सागर होणारचं
आज मी मावळतीचा अंधार असेल
पण उद्याला मी उगवतीचा सुर्यनारायण होणारचं
आज मी तळ्यातला एक बेडूक मासा आहे
पण उद्याला पाण्यातला राजा देवमासा होणारचं
आज मी एवलूसा भिरभिरणारा पतंग असेल
पण उद्याला उत्तुंग यशाची भरारी घेणारा गरुड होणारचं
आज मी वळवाचा अवेळी बरसणारा पाऊस असेल
पण उद्याला धो-धो कोसळणारा हस्त नक्षत्राचा वरूण होणारचं
आज मी असेल आडखळणारा उंचवटा पायवाटेचा,
पण उद्या अभेद्य असा हिमालय पर्वत होणारचं..
आज मी असेल दिनरात राबंणार जनावर मुकं
पण उद्या मी गरजणारा सिंह होणारंच..
आज मी असेल स्वप्नाळू मनूष्य
उद्या झापडं पुसूनी कष्टाळू पुरूष होणारचं..
आज असेल मी एक तारा अदृष्यातला
पण उद्याला दिशादर्शक शुक्रतारा होणारचं
आज असेल मी झुळूक पात्यासवे लवणारी
पण उद्याला वादळ विकासाचे होणारचं
आज असेल मी एकटा या जगात
पण उद्याला तुम्हाला घेवून उडणारा एकीचा थवा होणारचं..
रविवार, १९ एप्रिल, २००९
आज मी
१:४७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा