झोपडपट्टीत गावठी Bomb चा स्फोट झाला,
सगळी धरती हादरली;
हसनमियाला जबर धक्का बसला,
तसाच जबर धक्का बसला रामदेवला !
मेंदुवर परिणाम होवुन धक्क्याने,
दोघांनाही आपली नावं आठवेनात;
हसनमियाला आठवेना मुसलमान असल्याचं,
रामदेव तर हिंदु हा शब्ददेखील विसरला !
निवडणुक तर जवळ येतेय, वास येतोय;
घरंदारं पडली, माणसं मरुन गेली,
तर त्यात विशेष काही नाही !
हिंदु कोण आणि कोण मुसलमान
जर हेच या दोघांना स्मरलं नाही
तर या देशाचं काय आणि कसं होणार ?
रामदेव आणि हसनमिया अशा या अवस्थेत
चाकु घेवुन एकमेकांना भोसकु शकणार नाहीत
हिंदु कोण आणि कोण मुसलमान
हेच जर दोघेही विसरले तर
थोर थोर नेत्यांची सत्ता कशी टिकणार ?
हसनमिया आणि रामदेव दोघेही
या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत :
धर्मावर हे केवढं मोठं संकट आलंय !
दोघांना इस्पितळात नेण्याचं नंतर पाहू :
धर्मावरच्या संकटाचा आधी विचार केला पाहिजे !
रविवार, १९ एप्रिल, २००९
आधी विचार केला पाहिजे !
१:४७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा