Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २५ एप्रिल, २००९

चारोळी

Share

त्याग करून तू
स्वताचा मोठेपणा जपलास
माझ्या प्रीतिचा
मात्र अवमान करून गेलास

*********************************

सात समुद्र अथांग,
तुज्या अणि माज्या मधे..
तरीही तुजा प्रत्येक श्वास
दरवलाला माज्या मना मधे॥
----------------------------
सात समुद्र जरी असले
तुझ्या माझ्या मधे
तरी एकमेकांच्या मनात आपण
सांग अन्तर उरले कुठे

*********************************

स्वत्व देवू शकले नही तुला,
माझे श्वास अर्पिले तुला ...
तुझे आयुष्य फुलण्यासाठी ,
माझा श्वासोश्वास झाला ..
--------------------------
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझ्या आठवणींत
माझा उर पाझरे

*********************************
त्याग करून तू
स्वताचा मोठेपणा जपलास
माझ्या प्रीतिचा
मात्र अवमान करून गेलास
----------------------------------------


त्याग करून मी माझा
मोठेपणा दाखवत नव्हतो
तर तुझ्या श्वासांची माझ्यासाठी
असलेली किंमत दाखवत होतो

*********************************

सात समुद्र अथांग,
तुज्या अणि माज्या मधे..
तरीही तुजा प्रत्येक श्वास
दरवलाला माज्या मना मधे॥
---------------------------
समुद्र जरी अथांग असला तरी
मनाची त्याला कशी सर
विहंग होवून आकाशी उडे
क्षणांत कापे लाखों अंतर

*********************************

तुझा श्वास माझ्यात हरवतो
तुझ्या मनात माझा गंध दरवळतो
फक्त तुला म्हणून सांगते
माझा ही जीव तुज्यात अडकतो

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
===============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
काळसर्पाने मात्र आपल्या
प्रेमावर घाला घातला

*********************************

स्वत्व देवू शकले नही तुला,
माझे श्वास अर्पिले तुला ...
तुझे आयुष्य फुलण्यासाठी ,
माझा श्वासोश्वास झाला ..
--------------------------
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझ्या आठवणींत
माझा उर पाझरे
=========
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझा माझ्यावर असलेला
थोडासा विश्वास पुरे

*********************************

आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला
==============
तुझ्या त्यागाचे
काय वर्णू मी मोल्..
महान ठरल्या सर्व
तुझ्या भावना अबोल.....

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
===============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
काळसर्पाने मात्र आपल्या
प्रेमावर घाला घातला
============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
तुझ्या विरहाच्या जाणीवेने
श्वास माझा कोंडला

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
---------------------------------------
मी झिजतोय ह्याचे
नव्हते मज भय
तू जगत्येस हीच भावना
होती सुखावह

*********************************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top