सखे, आठवते तुला?
अशाच ढगाळ संध्याकाळी...
दाट फुलून आलेल्या गुलमोहरखाली
हातात हात घेऊन आपले बसणे...
"हवेत जरा गारवा आहे" असे म्हणत
हळूच तुझे मला बिलगणे...
तुझे भूरभूरणारे केस
माझ्या थरथरत्या हाताने सावरणे...
पावसाची पर्वा न करता
तसेच चिंब भिजणे...
निरोप घेताना
डोळ्यांचे ते पाणावणे...
गालांवरून ओघळणार्या मोत्यांचे
पावसाच्या पाण्यात विरघळणे ...
आणि पुन:पुन्हा मागे वळून बघत
पाय ओढत घरी जाणे...
..सखे, आठवते तुला?
शनिवार, २५ एप्रिल, २००९
सखे, आठवते तुला?
१२:०५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा