Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २५ एप्रिल, २००९

पहिली रात्र

Share

जवळ ये सखे अशी
हातात हात गुंफू दे
नाजूक स्पर्शफुले उमलत
ही रात्र अशीच सरु दे.

डोळ्यांत तुझ्या त्या गहिर्‍या
खोल खोल मज हरवू दे
चिरस्मृती मनातील उजळत
ही रात्र अशीच सरु दे.

एकांतातल्या सहवासात या
मुकया क्षणानां बहरू दे
लज्जेची लाली तुझ्या गालांवर पसरत
ही रात्र अशीच सरु दे.

चूरगळलेला गजरा तुझा
मिलन-गोष्ट आपुली सांगू दे
सुगंध-सलाम रातराणीचा घेत
ही रात्र अशीच सरु दे.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top