तुजवाचून........:
मी चालली होती, एकटीच माझ्या वाटेने.....
कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने......
तसा डोक्यावरचा सुर्य होताच माझ्या साथीला.....
जणु तो साथ देत होता माझ्या संथ गतीला.......
मला भान न होते माझ्याही अस्तित्वाचे.........
चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे......
अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला.....
भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला.....
माझ्या शांत चेहरयावर हसु उमटले......
गुढ प्रकृतीचे जणु फक्त मलाच उमगले......
आतुर होऊन मी ढगाकडे पाहु लागली.......
पावसाच्या नुसत्या कल्पनेने मी प्रफ़ुल्लीत होऊ लागली.....
मला वाटल पावसाच्या आगणित सरी कोसळणार.....
अन.. मतीचा सुगंध माझ्या श्वासात मिसळाणार......
पण....तो मात्र मला नुसतीच आशा दाखऊन परतला.....
ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला......
डोळयातुन माझ्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले.......
त्या थेंबामुळे जणू सारे आसमंत उजळले....
मी शुन्य नजरेने माझ्या वाटेकडे पाहु लागली.......
थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली....
रविवार, १९ एप्रिल, २००९
तुजवाचून........:
२:०२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा