Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

आरंभ - अंत

Share

त्याला चांगलं माहित असतं
ज्याला आरंभ असतो
त्याला अंतही असतो

म्हणून अंताचा विचार केल्याशिवाय
तो कशाला आरंभ करत नाही
काही नीट संपवता येत नसेल तर
तो सुरू करत नाही

ज्या ठिकणी जायचं असतं
त्याचा रस्ता सोडत नाही
आणि जिथे जायचं नसतं
तिकडचा पत्ता विचारत नाही

तो ध्येय किंवा लढाई निवडताना
अंताचा विचार करतो
"मी कशासाठी, कोणासाठी लढतोय?
मी कुठे जातोय, काय करतोय?
हे सगळं मला पटतय का?"
या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत
तर तो पुढे जात नाही

पण एकदा लढायचं ठरवलं की
माघार पत्करणार नाही
पराजय चालणार नाही
मरण आवडेल पण
अपमान खपणार नाही

जे सुरू केलय त्याचा
अंत नीट झालाच पाहिजे
वाईट माणसं जिंकली तरी चालेल पण
चांगला माणूस हरला नाही पाहिजे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top